17 July 2023 Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

17 July 2023 Dinvishesh : 17 जुलै दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

17 July 2023 Dinvishesh : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत....

Published by : Sagar Pradhan

Dinvishesh 17 July 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.


आज काय घडलं

१९९६: चेन्नई - मद्रास म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले

१९७६: ऑलिम्पिकस् - २१व्या स्पर्धांना कॅनडा देशात सुरवात.

१९७५: अमेरिकेचे अपोलो आणि रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.

१९५५: डिस्नेलँड, कॅलिफोर्निया - सुरू.

१९४७: मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.

१९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.

१८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.

१८१९: ऍडॅम्स-ओनिस करार - फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.

१८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

आज यांचा जन्म

१९५४: अँजेला मेर्केल - जर्मनीच्या चॅन्सेलर

१९३०: बाबूराव बागूल - दलित साहित्यिक (निधन: २६ मार्च २००८)

१९२३: जॉन कूपर - कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक (निधन: २४ डिसेंबर २०००)

१९२१: लुई लाचेनल - अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक (निधन: २५ नोव्हेंबर १९५५)

१९२०: गॉर्डन गूल्ड - लेसरचे शोधक (निधन: १६ सप्टेंबर २००५)

१९१९: स्नेहल भाटकर - संगीतकार (निधन: २९ मे २००७)

१९१८: कार्लोसमनुएल अराना ओसोरिया - ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष

१९१७: बिजोन भट्टाचार्य - भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (निधन: १९ जानेवारी १९७८)

१८८९: अर्लस्टॅनले गार्डनर - अमेरिकन लेखक (निधन: ११ मार्च १९७०)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: सी.एस. शेषाद्री - भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २९ फेब्रुवारी १९३२)

२०१२: मृणाल गोरे - समाजवादी नेत्या (जन्म: २४ जून १९२८)

२०१२: मार्शा सिंह - भारतीय-इंग्रजी राजकारणी (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)

२००५: सर एडवर्ड हीथ - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान

२००३: वॉल्टर झाप - मिनॉक्सचे शोधक (जन्म: ४ सप्टेंबर १९०५)

१९९२: कानन देवी - भारतीय अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २२ एप्रिल १९१६)

१९९२: शांता हुबळीकर - अभिनेत्री (जन्म: १४ एप्रिल १९१४)

१९५६: बोडो वॉन बोररी - इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक (जन्म: २२ मे १९०५)

१९२८: अल्वारो ओब्रेगन - मेक्सिको देशाचे ४६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८८०)

१७९०: ऍडॅम स्मिथ - स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती