लोकशाही स्पेशल

दिनविशेष 22 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Team Lokshahi

Dinvishesh 22 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 22 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.

२००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.

१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.

१९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.

१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

आज यांचा जन्म

१९३४: विजय आनंद - भारतीय चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक (निधन: २३ फेब्रुवारी २००४)

१९२२: शांता बुध्दिसागर - मराठी लेखिका

१९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर - संतसाहित्याचे अभ्यासक

१९१६: सत्येन बोस - बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक (निधन: ९ जून १९९३)

१९१६: हरीलाल उपाध्याय - गुजराथी लेखक आणि कवी (निधन: १५ जानेवारी १९९४)

१९११: अनिरुद्ध घनश्याम रेळे - मराठी लेखक

१९०९: यू. थांट - संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (निधन: २५ नोव्हेंबर १९७४)

१९०१: निर्मलकुमार बोस - भारतीय मानवशास्रज्ञ

१८९९: दिलीप कुमार रॉय - हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ

१८९६: सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला - कवी

१५६१: सर फ्रँन्सिस बेकन - इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (निधन: ९ एप्रिल १६२६)

आज यांची पुण्यातिथी

२०१४: अक्किनेनी नागेश्वर राव - भारतीय अभिनेते आणि निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २० सप्टेंबर १९२३)

१९९९: ग्रॅहॅम स्टेन्स - ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक

१९८२: एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा - चिली देशाचे २८वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ जानेवारी १९११)

१९७८: हर्बर्ट सटक्लिफ - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)

१९७५: धोंडो वासुदेव गद्रे - केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)

१९७२: स्वामी रामानंद तीर्थ - भारतीय राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

१९०१: राणी व्हिक्टोरिया - ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणाऱ्या राणी (जन्म: २४ मे १८१९)

१६८२: समर्थ रामदास स्वामी - भारतीय संत, तत्त्वज्ञ व आध्यात्मिक गुरु

१६६६: शहाजहान - ५वा मुघल सम्राट (जन्म: ५ जानेवारी १५९२)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

Homeopathic Doctor : आजपासून आझाद मैदानात होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Shashikant Shinde : शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत, विविध मुद्द्यांवर चर्चा