लोकशाही स्पेशल

दिनविशेष 25 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 25 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 25 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: यासिन मलिक - काश्मिरी फुटीरतावादी नेते यांना विशेष भारतीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

२०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.

२०११: द ओपराह विन्फ्रे शो - चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.

१९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखोवारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.

१९९२: सुभाष मुखोपाध्याय - विख्यात बंगाली साहित्यिक यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

१९८५: बांगलादेश - देशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.

१९८१: रियाध गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) - या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.

१९७७: चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.

१९६३: ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) - स्थापना.

१९६१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.

१९५५: कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शीखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.

१९५३: टेलिव्हिजन - अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून प्रसारण सुरू झाले.

१६६६: मराठा साम्राज्य - छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैद.

आज यांचा जन्म

१९७२: करण जोहर - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक

१९२७: रॉबर्ट लुडलुम - अमेरिकन लेखक (निधन: १२ मार्च २००१)

१८९९: काझी नझरुल इस्लाम - भारतीय क्रांतिकारक आणि बंगाली कवी - पद्म भूषण (निधन: २९ ऑगस्ट १९७६)

१८९५: त्र्यंबक शंकर शेजवलकर - इतिहासकार व लेखक (निधन: २८ नोव्हेंबर १९६३)

१८८६: रास बिहारी बोस - भारतीय क्रांतिकारक (निधन: २१ जानेवारी १९४५)

१८७८: स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई - राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते (निधन: २८ मार्च १९१६)

१८३१: सर जॉन इलियट - ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ (निधन: १८ मार्च १९०८)

१०४८: शें झोन्ग - चिनी सम्राट (निधन: १ एप्रिल १०८५)

आज यांची पुण्यतिथी

२०१३: नंद कुमार पटेल - भारतीय राजकारणी (जन्म: ८ नोव्हेंबर १९५३)

२०१३: महेंद्र कर्मा - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ५ ऑगस्ट १९५०)

२००५: सुनील दत्त - भारतीय अभिनेते व राजकारणी - पद्मश्री (जन्म: ६ जून १९२९)

२००५: इस्माईल मर्चंट - भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते (जन्म: २५ डिसेंबर १९३६)

१९९८: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर - भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)

१९५४: गजान माणिकराव - आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद