महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा बोलली जाते. मराठी भाषा जगभरात पोहोचवण्याचे काम आजवर अनेक मराठी साहित्यिकांनी केले आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
भारतीय राज्यघटनेतील कलम 347 नुसार कोणत्याही भाषेला राजभाषा मान्यता देण्याची तरतुद आणि अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा विस्तारली आहे. नुकतेच दिल्लीमध्ये '98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' संपन्न झाले.
जेव्हा एखादी भाषा अधिक प्रमाणात बोली जाते तिला 'बोलीभाषा' म्हटले जाते.मराठीतील थोर साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान अधिक आहे. कुसुमाग्रज हे नाटककार, कथाकार, कांदबरी, कवी आणि समीक्षक यामध्ये मोठी ख्याती केली आहे.
वि. वा. शिरवाडकरांना कुसुमाग्रज नाव कसे पडले?
कुसुमाग्रज यांचे पुर्ण नाव 'विष्णु वामन शिरवाडकर' आहे. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला. कुसुमाग्रजांना सहा भाऊ एक लाडकी बहीण तीचे नाव कुसुम होते . कुसुमचा लाडका अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव ठेवले. वि. स. खांडेकर (विष्णू सखाराम खांडेकर) यांच्यानंतर साहित्य क्षेत्रातील 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्यिक ठरले.
कुसुमाग्रजांचा 1933 साली 'जीवनलहरी' नावाचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर कुसुमाग्रजांचे 'नटसम्राट' नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकावर आधारित नाटक करण्यात आले. 23 डिसेंबर 1970 रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पहिला प्रयोग झाला होता. या नाटकांच्या आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शकन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
कुसुमाग्रजांचे कवितासंग्रह
अक्षरबाग (१९९९), किनारा(१९५२), चाफा(१९९८), छंदोमयी (१९८२), जाईचा कुंज (१९३६), जीवन लहरी(१९३३), थांब सहेली (२००२), पांथेय (१९८९), प्रवासी पक्षी (१९८९), मराठी माती (१९६०), महावृक्ष (१९९७)
कुसुमाग्रजांचे कथासंग्रह
अंतराळ ,अपॉईंटमेंट , एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण , जादूची होडी ,प्रेम आणि मांजर, फुलवाली ,बारा निवडक कथा , सतारीचे बोल
कुसुमाग्रजांचे कादंबऱ्या
कल्पनेच्या तीरावर , जान्हवी , वैष्णव ,आठवणीपर, वाटेवरच्या सावल्या
मराठी भाषेची वैशिष्टये
भारतामधील 22 अधिकृत भाषांपैकी एक भाषा म्हणजे मराठी
जगातील सर्वाधिक बोलीभाषेपैकी मराठी ही 15 क्रमांकावर आहे. तर भारतामधील 3 री भाषा मराठी आहे.
'गौरव भाषा दिन' आणि 'राजभाषा दिन' नेमका यामधील फरक?
बऱ्याचवेळी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यामध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र्य राज्य तयार झाले होते. त्यावेळी मराठी भाषेला अधिकृत भाषा मानण्यात आली होती. त्यामुळे 1 मे रोजी 'राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी रोजी 'कुसुमाग्रज', यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.