Admin
लोकशाही स्पेशल

नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं; काय आहे या नाण्याचं वैशिष्ट्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मेला नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मेला नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यात विशेष गोष्ट आहे ती म्हणजे या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचं नाणं लॉन्च करण्यात येणार आहे.

नाण्याच्या पुढील बाजूच्या मध्यभागी अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयतेचा लिहिलेलं असेल. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि इंग्रजीमध्ये India असं लिहिलेलं असेल. या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असणार असून 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक वापरलं जाणार आहे.

नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र कोरलेलं असेल आणि त्याखाली 2023 हे वर्ष लिहिलं जाईल. संसद भवनच्या वरच्या बाजूला 'संसद संकुल' आणि खालच्या बाजूला 'Parliament Complex' लिहिलेलं असेल. भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत हे नाणं बनवण्यात आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार