लोकशाही स्पेशल

Air Force Day 2023 : आज वायुसेना दिन; जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

आज भारतीय वायुसेना 91 वा स्थापना दिन साजरा करत आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. आजचा दिवस वायुसेना गाजियाबादच्या हिंडन एयरबेसमध्ये साजरा करतात.

Published by : shweta walge

आज भारतीय वायुसेना 91 वा स्थापना दिन साजरा करत आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. आजचा दिवस वायुसेना गाजियाबादच्या हिंडन एयरबेसमध्ये साजरा करतात. वायुसेना दिनी भारतीय वायुसेनाचे चिफ आणि तीन सशस्त्र सेनांचे वरिष्ठ अधिकारी देखील सामिल होतात. देशाच्या वायुसीमेच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय वायुसेनेच्या जवानांच्या खांद्यावर असते. आजच्या दिवशी वायुसेनेचे पायलट हे वायुसेनेच्या वेगवेगळ्या विमानांचा एअर शो करतात.

वायुसेना दिवसाचे महत्व

आज हिंडन एअरबेसवर देशाच्या जुन्या आणि आत्याधुनिक विमानांच्यासोबत भारतीय वायुसेनेचे जवान चित्तथरारक एअर शो करतात. वायुसेनेबद्दल लोकांना माहिती देणे आणि देशाच्या हवाई सीमांच्या सुरक्षेसाठी भारतीय हवाई दलाचे कार्य दर्शवणे हे वायुसेना दिवस साजरा करण्यामागचे कारण आहे.

वायुसेना दिनाचा इतिहास

भारतीय वायुसेना दिवसाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये झाली. त्यावेळी भारतीय वायुसेनेचे नाव 'रॉयल इंडियन एयर फोर्स' असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर देश स्वतंत्र्य झाल्यावर नावामधील रॉयल हा शब्द काढून 'इंडियन एयर फोर्स' असे नाव ठेवण्यात आले.

भारतीय वायुसेनेचा इतिहास

असे मानले जाते की 1 एप्रिल 1933 मध्ये भारतीय वायुसेनेच्या पहिल्या पथकाची निर्मिती झाली. ज्यामध्ये 6आरएफ-ट्रेंड ऑफिसर आणि 19 जवान सामिल होते. तसेच दुसऱ्या विश्व युद्धाच्या दरम्यान भारतीय वायुसेनेने महत्वपूर्ण भूमिका साकारली. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय वायुसेनेने एकूण 5 युद्धांमध्ये सहभाग घेतला. यामधील 4 युद्ध ही पाकिस्तानसोबत तर 1 चिनसोबत होते. तसेच वायुसेना महत्वाच्या ऑपरेशन्समध्ये देखील भाग घेते. ज्यामध्ये ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस आणि बालाकोट एयर स्ट्राइक यांचा समावेश होतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?