Chandra Grahan 2022  Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

2022 वर्षातील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी म्हणजेच कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज ( 8 नोव्हेंबर) रोजी होणार असुन

Published by : shweta walge

2022 वर्षातील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी म्हणजेच कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज ( 8 नोव्हेंबर) रोजी होणार असुन, हे चंद्रग्रहण भारतासह दक्षिण/पूर्व युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या भागात देखील दिसणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या घटनेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही आहे. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात कोणत्याही अन्नपदार्थाचे सेवन करू नये.

वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहणाची वेळ 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.32 ते 7.27 पर्यंत असणार आहे. ग्रहणादरम्यान साधारणपणे कोणालाही खाण्याची बंदी असते. मात्र काही व्यक्तींना या काळात खाण्याची मुभा मिळू शकते. ग्रहण काळात कोणत्या व्यक्तींनी काय खावे आणि काय खाऊ नये, जाणून घ्या सविस्तर.

ग्रहण काळात कोणती व्यक्ती काय खाऊ शकते?

सामान्यपणे ग्रहण काळात खाण्याची बंदी असते, पण गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती काही गोष्टी गरजेनुसार खाऊ शकतात. कारण वृद्धांना वयानुसार औषधांची गरज असते. तसेच गर्भवती महिलांना वेळोवेळी अन्न आणि पाणी पिण्याची गरज असते. त्याचप्रमाणे लहान मुले जास्त काळ उपाशी राहू शकत नाहीत. त्यांना अन्न खाण्यासही मनाई केली जाऊ शकत नाही. मात्र या काळात पदार्थांमध्ये तुळशीची पाने जरूर टाकावीत.

ग्रहण काळात काय खाऊ नये

ग्रहण काळात धार्मिक शास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार शिजवलेले अन्न आणि कापलेली फळं खाणे टाळावे. या दरम्यान शिजवलेले अन्न आणि कापलेली फळे खाल्ल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

ग्रहण काळात काय खावे

ग्रहण काळात वृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांनी दूध प्यायला हरकत नाही. या दुधात तुळशीची पाने टाकून उकळवा आणि मगच घ्या. याशिवाय ग्रहणकाळात नारळ, केळी, डाळिंब आणि आंबा खाऊ शकतो. तसेच ड्रायफ्रुट्सही खाऊ शकतो. त्यामध्ये भरपूर ऊर्जा असते, जी गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आणि आवश्यक असते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!