लोकशाही स्पेशल

Chhatrapati Sambhaji Maharaj : 150 युद्ध लढणारे अन् एकाही युद्धात हार न पत्करणारे छत्रपती

Published by : Team Lokshahi

अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, स्वराज्यरक्षक अशी अनेक बिरुदे लाभलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची आज पुण्यतिथी (Sambhaji Maharaj Punyatithi 2022) आहे. 14 मे 1657 रोजी सईबाईंच्या पोटी जन्म घेतलेल्या शंभूराजांचे 11 मार्च, 1689 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी त्यांचा निधन झाले. हिंदवी स्वराज निर्माण करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन एका ओळीत मांडता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर शंभूराजांनी 9 वर्षे राज्य केले. छत्रपती संभाजी महाराजांसाठी 'महा पराक्रमी परम प्रतापी, एकच होता माझा शंभू राजा', समर्पक ही ओळ आहे.

संभाजी महाराज यांचे लहानपणीचं आईचे छत्र हरवल्याने राजमाता जिजाऊ यांनी त्यांना सांभाळ केला होता. संभाजी महाराजांना मराठी, संस्कृत, फारसी, ब्रज, उर्दू, अरबी, इंग्रजी या भाषा (Language) वाचता आणि लिहिता येत असतं. त्याचबरोबर त्यांनी नायिकाभेद, सातसतक, नखशिख, हे ब्रिज भाषेतील ग्रंथ लिहिले होते. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजांचा रायगड (Raigad) किल्यावर पूर्णतः राज्याभिषेक झाला. संभाजी महाराजांचे लग्न जीवूबाई यांच्याशी लावण्यात आले असून लग्नानंतर त्यांचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. कोकणच्या किनारपट्टीवर कब्जा मिळवण्यासाठी संभाजी महाराजांचे लग्न येसूबाई (Yesubai) यांच्याशी लावण्यात आले होते. संभाजी महाराजांनी 150 युद्ध लढले आणि त्यांनी एकाही युद्धात हार नाही.एकही युद्ध न हरलेले असे छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती जगभर पसरली आहे.पुढे शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतरही त्यांनी हार पत्कारली नाही. अखेर 11 मार्च 1689 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यादिवशी फाल्गुन अमावस्या होती. हा दिवस तिथीनुसार त्यांची पुण्यतिथी किंवा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा