INC STATE PRESIDENT NANA PATOLE TEAM LOKSHAHI
लोकशाही स्पेशल

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये नाराजी! 'नाना' नकोसे?

फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हालचाली घडल्या आणि नाना पटोले (Nana Patole) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाले. पण,आता त्या घटनेला दोन वर्षे उलटल्यानंतर नानांचे काँग्रेसमधील सहकारी त्यांच्या कार्यपद्धतीवर असणारी नाराजी खुलेपणाने मांडत आहेत. या प्रकरणामुळे काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहतायत का? असा सवाल उपस्थित राहीला आहे.

Published by : Team Lokshahi

रोहित शिंदे | मुंबई: फेब्रुवारी 2021 मध्ये कोणत्याही ठोस कारणाविना माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं. तसं पाहायला गेलं तर संयमी नेतृत्व हि बाळासाहेब थोरातांची ओळख. राज्यात काँग्रेसला धडाडीच्या नेतृत्वाची गरज असल्याचं कारण देत हायकमांडच्या आदेशानुसार नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी आले.

पटोलेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह: नाना पटोलेंचा आक्रमक बाणा, थेट भूमिका घेण्याची पद्धत या कारणांमळे पटोले प्रदेशाध्यक्षपदी आले, असं काँग्रेसकडून सांगितलं जात होत. आता, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसला कितपत राजकीय फायदा झाला? हा काँग्रेससाठी स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. पण, एक गोष्ट मात्र पक्की आहे. ती म्हणजे पटोलेंच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसमध्ये नाराज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

सत्यजित तांबेंचे आरोप: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीनंतर नानांच्या विरोधात पक्ष सहकारी उघडपणे बोलु लागलेत, आणि याची सुरूवात झाली ती पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंच्या (Satyajit Tambes allegations on Nana Patole) नाशिकमधील पत्रकार परिषदेतुन. 9 दशक कॉंग्रेससाठी झटणाऱ्या कुटुंबाला कॉंग्रेसमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला , असा गंभीर आरोप तांबेंनी पटोलेंवर केला.

माजी प्रदेशाध्यक्ष थोरातांचे आरोप: आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांतांनी या आरोपांमध्ये भर टाकली आहे. नाना पटोलेंसोबत काम करणेचं अशक्य असल्याचं थोरातांचं म्हणण आहे.तस पत्रच त्यांनी लिहिल हायकमांडला लिहिलं असल्याची माहिती आहे.

प्रदेशाध्यक्ष बदला- आशिष देशमुख: आता हे प्रकरण एवढ्यातं आटोपणार नाही असंचं दिसतं आहे. या प्रकरणात नागपूरचे काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुखांनीही उडी घेतली आहे. त्यांनी थेट प्रदेशध्याक्ष बदलण्याचीच मागणी केली आहे.

पुढे काय? :आता पटोलेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असणाऱ्यांची हि गर्दी वाढतचं चालली आहे. दरम्यान, एवढ्यात काँग्रेसच्या हायकमांडपर्यंत हि बाब पोहोचलीही असेल. आता या प्रकरणात पुढे घडणाऱ्या घडामोडी निश्चितचं लक्षवेधी असणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा