लोकशाही स्पेशल

International Women Day :आपली पुरुषप्रधान संस्कृती असली तरी आजची स्त्री सशक्त आहे- अभिनेत्री निशिगंधा वाड

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चित्रनगरीत आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी स्त्रियांच्या सशक्तीकरणावर भाष्य केले. 'आपली पुरुषप्रधान संस्कृती असली तरी आजची स्त्री सशक्त आहे' असे त्यांनी सांगितले.

Published by : Team Lokshahi

मुंबई, दि. ८ मार्च : फिल्मसिटी अर्थात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व 'बी द चेंज संस्थे'च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी चित्रनगरीत महिला दिनानिमित्ताने (Women's Day) विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड, डॉ. अनुजा पुरंदरे आणि श्री. ओनिल कुलकर्णी यांनी विविध विषयांवर चित्रनगरीतील महिलांसोबत संवाद साधला.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी महिलांना शुभेच्छा दिल्या. चित्रनगरीच्या विकासामध्ये महिलांचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासकीय स्तरावर चित्रनगरीच्या महिला अधिकाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्ताधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, बी.द.चेंजच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी आर्या मोरे आणि महामंडळातील महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होत्या.

दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी 'स्त्रियांपुढील आव्हाने' या विषयावर संवाद साधला. "आपली पुरुषप्रधान संस्कृती असली तरी आजची स्त्री सशक्त आहे. जगाच्या पाठीवर आज भारतीय स्त्री म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी. आपल्यातल्या चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या कशा होतील आणि उणीवांची वजाबाकी न करता त्यावर सुधारणा केल्या तर यशाचं सहजतेनं स्वागत करता येईल", असं निशिगंधा वाड म्हणाल्या.

डॉ. अनुजा पुरंदरे यांनी 'महिलांचेआरोग्य' या विषयावर भाष्य करताना मासिक पाळी, गर्भधारणा, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या अनेक समस्यांवर भाष्य केलं. चांगला आहार घेणं, व्यायाम करणं, वैद्यकीय सल्ला घेणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी अधोरेखित केलं. त्याचबरोबर ओनिल कुलकर्णी यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित स्त्रीयांना 'POSH ACT'बद्दल माहिती दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा