लोकशाही स्पेशल

राज्यभरातील शिव मंदिरे भाविकांनी गजबजली

Published by : Team Lokshahi

बम बम भोलेचा जयघोष, शिव मंदिरे भक्तांनी गजबजली
देशभरात आज महाशिवरात्रीचा (ahashivratri)उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी पुजा आयोजित करण्यात आले आहे. करोनाच्या (crona)लाटेनंतर तब्बल दोन वर्षोनंतर पुन्हा राज्यात शिव मंदिरे भाविकांनी गजबजली. महाशिवरात्रीनिमित्त शंकर भगवानाचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्सुक असतात. या वेळेसही भाविकांनी ऐतिहासिक अश्या अनेक मंदिरामध्ये मोठी गर्दी केली आहे.

OLYMPUS DIGITAL CAMERA

नाशिक Nashik
नाशिकच्या रामकुंडा (Ramkunda) जवळील असलेल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या कपालेश्वर (Kapaleshwar temple) मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी  झाली आहे. शिव बोले च्या गजरात पूर्ण मंदिर गजबजलेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध कमी केल्याने सर्व मंदिरे खुली झाली. राज्यातील शहरा सह जिल्ह्यातील सर्वच मंदिरामध्ये शिवभक्तानि गजबजलीये सर्व मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिव मंदिरात आज दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे

मनमाड Manmad
मनमाडच्या नागापूर येथील पुरातन हेमांडपंथी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिरात (Nageshwar temple) महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासून रांगा लावल्या आहे. शेकडो वर्षापासून येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. कोरोनामुळे दोन वर्ष यात्रा भरू शकली नव्हती. यंदा मात्र कोरोनाचे नियम काहीसे शिथिल झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बम बम भोलेच्या जयघोषात धार्मिक विधी पार पडले. महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पुणे pune
देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या पेशवेकालीन ओमकारेश्वर मंदिरामध्ये (Omkareshwar temple) पहाटेपासून भक्तांनी महादेवाच दर्शन घेण्यासाठी गर्दी केलीय. यंदा संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून फुलांची आरास ही करण्यात आलीय. आज दिवसभरात विविध कार्यक्रमाच आयोजन मंदिर प्रशासनाच्या वतींन करण्यात आलं आहे.

औरंगाबाद वेरूळ (Aurangabad Ellora)- घृष्णेश्वर मंदिर
देशातील महत्वाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी अखेरचे बारावे ज्योतीर्लिंग श्री घृष्णेश्वर
(Ghrishneshwar Temple) तीर्थक्षेत्र ठिकाणी महाशिवरात्री निम्मित भाविक भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाच संकट कमी झाल्याने भाविकांना थेट गाभार्‍यात जाऊन घृष्णेश्वराचे दर्शन घेत आहेत, यावेळी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी सुद्धा सकाळीच घृष्णेश्वर मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेऊन आपल्या मनातली मनोकामना देवापुढे मांडली. बऱ्याच दिवसानंतर भाविकांना थेट महादेवाचे दर्शन घेता येत असल्याने भाविकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाले.
औरंगाबाद जिल्ह्यात देशातील सर्वाधिक उंचीचे शिवमंदिर
देशातील सर्वाधिक उंचीचे शिवमंदिर वेरूळमधील श्री. विश्वकर्मा तीर्थधाम (Vishwakarma) परिसरात साकारले आहे. प्रत्यक्षात ६० फुटाचे शिवलिंग प्रतिकृतीचे मंदिर असून त्याच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी १२ ज्योतिर्लिंगांची प्राणप्रतिष्ठापना आहे. तब्बल २३ वर्षापासून सुरू असलेले मंदिराचे काम पूर्ण झाले असून आज महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर ते खुले करण्यात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : बुम-बुम बुमराहची कमाल अन् दुसरी विकेट, मोहम्मद हरिस 3 रनसह बाद

Asia Cup 2025 IND vs PAK : टॉस जिंकला म्हणजे सामना जिंकला! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबईच्या मैदानाचे गूढ जाणून घ्या

Jaipur Accident : जयपूरमध्ये भीषण अपघातात संपुर्ण कुटुंब उध्वस्त! हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत असताना...