लोकशाही स्पेशल

दिनविशेष 02 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : shweta walge

Dinvishesh 02 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 02 मार्च या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००१: बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद् ध्वस्त करण्यास सुरूवात केली.

१९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.

१९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

१९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.

१९५६: मोरोक्को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.

१९४६: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.

१९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.

१८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.

१८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.

आज यांचा जन्म

१९७७: अँड्र्यू स्ट्रॉस - इंग्लिश क्रिकेटपटू

१९४२: गीता नागाभूषण - भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: २८ जून २०२०)

१९३१: राम शेवाळकर - मराठी साहित्यिक

१९३१: मिखाईल गोर्बाचेव्ह - सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष - नोबेल पुरस्कार (निधन: ३० ऑगस्ट २०२२)

१९३१: राम बाळकृष्ण शेवाळकर - जेष्ठ साहित्यिक (निधन: ३ मे २००९)

आज यांची पुण्यतिथी

१९८६: डॉ. काशिनाथ घाणेकर मराठी चित्रपट अभिनेते

१९४९: सरोजिनी नायडू - प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी (जन्म: १३ फेब्रुवारी १८७९)

१९३०: डी. एच. लॉरेन्स इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)

१५६८: संत मीराबाई -

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुढील २४ ते ४८ तासांसाठी विदर्भाला ऑरेंज अलर्ट

Pandharpur : पंढरपुरात सुरक्षा रक्षकाची दादागिरी! दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला अमानुष मारहाण

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी