लोकशाही स्पेशल

दिनविशेष 11 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 11 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 11 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: राजौरी आंतकी हल्ला, जम्मू काश्मीर - भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर गोळीबारात दोन आतंकी हल्लेखोर ठार झाले.

२०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

२००३: नाटो (NATO) - अफगाणिस्तानमधील शांती सैन्याची कमान हाती घेतली, ते नाटोचे ५४ वर्षांच्या इतिहासात युरोपबाहेरील पहिले मोठे ऑपरेशन आहे.

१९७९: मोर्बी, गुजरात धरणफुटी दुर्घटना - किमान हजारो लोकांचे निधन.

१९६२: अँड्रियन निकोलायेव - अंतराळवीर मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती बनले.

१९६१: दादरा व नगर हवेली - भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

१९४३: सी. डी. देशमुख - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

आज यांचा जन्म

१९५४: यशपाल शर्मा - भारतीय क्रिकेटपटू

१९४३: जनरल परवेझ मुशर्रफ - पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ फेब्रुवारी २०२३)

१९२८: रामाश्रेय झा - शास्त्रीय संगीतकार, वादक - संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १ जानेवारी २००९)

१९२८: वि. स. वाळिंबे - भारतीय लेखक व पत्रकार (निधन: २२ फेब्रुवारी २०००)

१९११: प्रेम भाटिया - पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (निधन: ८ मे १९९५)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: जे. एस. ग्रेवाल - भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक प्रशासक, गुरु नानक देव विद्यापीठाचे कुलगुरू - पद्मश्री

२०२२: बाबुराव पाचर्णे - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार

२०२२: शिमोगा सुबन्ना - भारतीय पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: १४ डिसेंबर १९३८)

२०२२: रणजित पटनायक - भारतीय पटकथा लेखक

२०००: पी. जयराज - भारतीय अभिनेते - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)

१९९९: रामनाथ पारकर - क्रिकेटपटू (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)

१९७०: इरावती कर्वे - मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १५ डिसेंबर १९०५)

१९०८: खुदिराम बोस - भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ डिसेंबर १८८९)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख