Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा

सुरेश प्रभू यांचा जन्म, मेजर रामा राघोबा राणे

Published by : Team Lokshahi

सुविचार

भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही

आज जागतिक लोकसंख्या दिन : १९८९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमाच्या सभेत ११ जुलै हा दिवस जगातिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते.

आज काय घडले

  • १६५९ मध्ये मुघल सेनापती अफजलखान यांच्या सोबत युद्ध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून निघून प्रताप गडावर गेले.

  • १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा होऊन त्यांना मंडालेच्या तुरुंगात कैद करण्यात आले.

  • १९९४ मध्ये दिल्लीच्या पोलीस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमॅन मॅगसेस पुरस्कार जाहीर झाला.

  • २००६ मध्ये मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार झाले. या स्फोटात ७१४ लोक जखमी झाले.

आज यांचा जन्म

  • कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा १८८९ मध्ये जन्म झाला. त्यांनी जवळपास साठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

  • भंडारकर प्राच्य संशोधन संस्थेचे प्रमुख अधिकारी परशुराम कृष्ण गोडे यांचा १८९१ मध्ये जन्म झाला.

  • लेखक, कादंबरीकार व इतिहासकार शंकरराव खरात यांचा १९२१ मध्ये जन्म झाला. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते.

  • भारतीय राजकारणी सुरेश प्रभू यांचा १९५३ मध्ये जन्म झाला. निष्कलंक राजकारण्यांपैकी ते एक आहेत. वाजपेय सरकार व मोदी सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्री होते.

  • हिंदी चित्रपट अभिनेता कुमार गौरव यांचा १९६० मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा राणे यांचे १९९४ मध्ये निधन झाले.

  • कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. यांचा २००३ मध्ये जन्म झाला. रहस्यकथा, कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथाही लिहिल्या.

  • गीतकार, कवी शांताराम नांदगावकर यांचे २००९ मध्ये निधन झाले. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू