Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले: अर्जुन रणगाड्यांची भारतीय लष्कराकडे

अण्णा हजारे यांचा जन्म, अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन

Published by : Lokshahi News

भारतीय बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची तुकडी भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.

सुविचार

दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

आज काय घडले

  • १८६९ साली महाराष्ट्रात विधवा विवाह पध्दत मोडीत निघाली. पहिला विधवा विवाह पांडुरंग विनायक करमकर यांनी वेणूताईच्या गळ्यात माळ घालून केला.

  • १९९३ मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची तुकडी भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.

  • २००१ मध्ये ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.

आज यांचा जन्म

  • मराठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन श्रीपत खैर यांचा १८९८ मध्ये जन्म झाला. त्यांनी महाराष्ट्र विद्यालय ही शिक्षण संस्थेची स्थापना केली.

  • स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा १९०७ मध्ये जन्म झाला.

  • लेखक, समिक्षक, शिक्षक, ललित लेखक, शंकर वैद्य यांचा १९२८ मध्ये जन्म झाला.

  • लोकप्रिय भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री व पार्श्वगायिका सुरैया जमाल शेख यांचा १९२९ मध्ये जन्म झाला. त्यांनी १९४० आणि १९५०च्या दशकांत अभिनय व गायन केले.

  • लेखिका, समिक्षिका सरोजिनी वैद्य यांचा १९३३ मध्ये जन्म झाला. ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले.

  • माहितीच्या अधिकार व लोकपाल आंदोलनाचे जनक किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे यांचा १९३७ मध्ये जन्म झाला. समाजसेवेच्या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी त्यांचा जन्म झाला.

  • भारतीय स्टील उद्योग सम्राट व जगातील सर्वात मोठ्या स्टीलमेकिंग कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांचा १९५० मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे १९३१ मध्ये निधन झाले.

  • साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री यांचे १९८३ मध्ये निधन झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?