Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : मिकी माऊसचे पहिल्यांदा प्रसारण

माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म, के. एम. करिअप्पा यांचे निधन

Published by : Team Lokshahi

जगातल्या पहिल्या मशीनगनचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले. ती मशीनगन ३२ एमएमची होती.

सुविचार

संकट हे पाण्यासारखे असते. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही; तर त्यात कसे पोहायचे ? ते शिकवण्यासाठी आलेले असते.

आज काय घडले

  • १७१८ मध्ये जगातल्या पहिल्या मशीनगनचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले. ती मशीनगन ३२ एमएमची होती.

  • १९२८ मध्ये मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.

  • १९६० मध्ये सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.

आज यांचा जन्म

  • भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांचा १८१७ मध्ये जन्म झाला. ते ब्रह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते.

  • नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा १८५९ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय स्वातंत्र्यसेनानी सुखदेव थापर यांचा १९०७ मध्ये जन्म झाला. जे. पी. सॉण्डर्स यास ठार मारण्याच्या कटात त्यांचा सहभाग होता.

  • नामवंत अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा १९६७ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले गेले आहे.

आज यांची पुण्यतिथी

  • स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे १९९३ मध्ये निधन झाले.

  • जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे २००० मध्ये निधन झाले. १९५० ते १९८० दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटात काम केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा