Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : प्रथम मोडी लिपीचा वापर

निर्मलजीतसिंग सेखो यांचा जन्म, मृणाल गोरे यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

आज काय घडले

  • १८०२ मध्ये अक्षर काढण्यासाठी प्रथम मोडी लिपीचा वापर करण्यात आला.

  • १९४७ मध्ये मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७५० लोकांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला नव्हता, बोट सुस्थितीत होती, परंतु अचानक वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला आणि बोट कलंडली.

  • १९५५ मध्ये अमेरिकन व्यंग चित्रकार व लेखक वॉल्ट डिस्ने यांनी अॅ्नाहेम, कॅलिफोर्नियात ‘डिस्नेलँड’ सुरू केले.

  • १९९३ मध्ये तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला.

  • २००० मध्ये प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला यांना भरतनाट्यम शिरोमणी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

आज यांचा जन्म

  • मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचे संगीतकार स्नेहल भटकर यांचा १९१९ मध्ये जन्म झाला. त्यांना "महाराष्ट्रभूषण' पुरस्कार देण्यात आला आहे.

  • लेखक, कवी बाबुराव बागूल यांचा १९३० मध्ये जन्म झाला. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते ते होते.

  • मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित माजी भारतीय वायुसेना प्रमुख निर्मलजीतसिंग सेखो यांचा १९४३ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता व राजकीय अर्थव्यवस्थेचे प्रणेता अॅंडम स्मिथ यांचे १७९० मध्ये निधन झाले.

  • बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे १९९२ मध्ये निधन झाले.

  • अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे १९९२ मध्ये निधन झाले. त्यांचे 'माणूस' चित्रपटातील ‘आता कशाला उद्याची बात’ हे गाणे प्रसिद्ध झाले

  • ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे २०१२ मध्ये निधन झाले. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे त्यांनी नेतृत्व केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा