लोकशाही स्पेशल

दिनविशेष 17 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 17 October 2023 : सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 ऑक्टोबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन

डिजिटल सोसायटी दिन

१९९८: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणाऱ्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.

१९९६: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

१९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.

१९७९: मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.

१९५६: पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरु झाले.

१९४३: बर्मा रेल्वे रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.

१९३४: प्रभातचा अमृतमंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९३१: माफिया डॉन अल कपोन यांना आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.

१८८८: थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.

१८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.

आज यांचा जन्म

१९७०: अनिल कुंबळे - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री, अर्जुना पुरस्कार

१९६५: अरविंद डिसिल्व्हा - श्रीलंकेचे क्रिकेटपटू

१९५५: स्मिता पाटील - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १३ डिसेंबर १९८६)

१९४७: सिम्मी गरेवाल - चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका

१९३२: ललिता लाजमी - भारतीय चित्रकार (निधन: १३ फेब्रुवारी २०२३)

१९२३: शिवानी - भारतीय लेखक (निधन: २१ मार्च २००३)

१९१७: तात्यासाहेब कोर - वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक (निधन: १३ डिसेंबर १९९४)

१८९२: नारायणराव सोपानराव बोरावके - कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार (निधन: १६ फेब्रुवारी १९६८)

१८६९: पं. भास्करबुवा बखले - भारत गायन समाज संस्थेचे संस्थापक (निधन: ८ एप्रिल १९२२)

१८१७: सर सय्यद अहमद खान - भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (निधन: २७ मार्च १८९८)

आज यांची पुण्यतिथी

२००८: रविन्द्र पिंगे - ललित लेखक (जन्म: १३ मार्च १९२६)

१९९३: विजय भट - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (जन्म: १२ मे १९०७)

१९८१: कन्नादासन - भारतीय लेखक, कवी आणि गीतकार (जन्म: २४ जून १९२७)

१९०६: स्वामी रामतीर्थ - जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती