Dinvishesh 19 July 2023 : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 19 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०२०: भारतात - ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे १८९ लोकांचे निधन तर ४० लाख लोक बेघर झाले.
१९९६: ऑलिम्पिक - अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या स्पर्धांना सुरुवात.
१९९३: बानू कोयाजी - यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९४७: म्यानमार - नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
१९०३: टूर डी फ्रान्स - मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
१८३२: ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशन - स्थापना.
१६९२: अमेरिका - देशातील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.
आज यांचा जन्म
१९६१: हर्षा भोगले - भारतीय पत्रकार आणि लेखक
१९५५: रॉजर बिन्नी - भारतीय क्रिकेटपटू
१९३८: जयंत नारळीकर - सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ - पद्म विभूषण, पद्म भूषण
१९०९: बाल्मनी अम्मा - भारतीय कवी आणि लेखक (निधन: २९ सप्टेंबर २००४)
१९०२: यशवंत केळकर - भारतीय कवी, कोशकार, इतिहास संशोधक (निधन: ८ फेब्रुवारी १९९४)
१९०२: समृतरा राघवाचार्य - भारतीय गायक, निर्माते (निधन: १६ मार्च १९६८)
१८९९: बालाइ चांद मुखोपाध्याय - भारतीय डॉक्टर, लेखक (निधन: ९ फेब्रुवारी १९८९)
१८९४: पर्सी स्पेंसर - मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक (निधन: ८ सप्टेंबर १९७०)
१८२७: मंगल पांडे - १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर (निधन: ८ एप्रिल १८५७)
आज यांची पुण्यतिथी
२०२०: रजत मुखर्जी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक
२००४: झेन्को सुझुकी - जपानचे पंतप्रधान
१९६८: प्रतापसिंग गायकवाड - बडोद्याचे महाराज (जन्म: २९ जून १९०८)
१८८२: फ्रान्सिस बाल्फोर - प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)