Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : मुक्ताबाईंनी घेतली समाधी

सखाराम बाईँडर म्हणजेच विजय तेंडुलकर यांचे निधन झाले

Published by : Team Lokshahi

संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे समाधी घेतली. त्यांच्या नावाने एदलाबाद या गावाचे नाव मुक्ताईनगर करण्यात आले.

सुविचार

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

आज काय घडले

  • १२९७ मध्ये संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे समाधी घेतली.

  • १९१० मध्ये हॅले धुमकेतूचे शेपूट पृथ्वीला चाटून गेले. दर ७५ ते ७६ वर्षांनी हा धुमकेतू पृथ्वीवरुन दिसतो. १९१० नंतर १९८६ मध्ये तो दिसला होता आता २०६१ मध्ये तो दिसेल.

  • १९७१ मध्ये सोव्हियत संघाने मार्स २ या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.

आज यांचा जन्म

  • भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा १९०८ मध्ये जन्म झाला.

  • भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा १९१३ मध्ये जन्म झाला. २५ जुलै १९७७ ते २५ जुलै १९८२ या दरम्यान ते राष्ट्रपती होते.

  • आध्यात्मिक गुरू आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा १९२६ मध्ये जन्म झाला. त्यांनी ध्यान व क्रिया योगचा प्रसार केला.

  • आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचा १९३८ मध्ये जन्म झाला. ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.

आज यांची पुण्यतिथी

  • आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे १९०४ मध्ये निधन झाले.

  • औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे १८५८ मध्ये निधन झाले. ते बंगाली इतिहासकार होते.

  • बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे १९९७ मध्ये निधन झाले.

  • काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे १९९९ मध्ये निधन झाले. प्रसिद्ध क्रिकटपटू सचिन तेंडुलकरचे ते वडील होते.

  • नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे २००८ मध्ये निधन झाले. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा