लोकशाही स्पेशल

दिनविशेष 2 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 2 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 2 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत - येथे संशयास्पद गॅस गळतीमुळे किमान ५३ लोक जखमी.

२००१: पुल्लेला गोपीचंद - भारतीय बॅडमिंटन खेळाडू, यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर.

१९९९: गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत - आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.

१९९६: मायकेल जॉन्सन - एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारे पहिले व्यक्ती बनले.

१९७९: रजनीकांत आरोळे - यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.

१९१८: कॅनडा - देशाच्या इतिहासातील पहिला सामान्य संप व्हँकुव्हर येथे झाला.

१८५८: भारत सरकार कायदा १८५८ - या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटीश राजवटीने घेतली.

१७९०: अमेरिका - पहिली जनगणना सुरू झाली.

१६७७: मराठा साम्राज्य - शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.

आज यांचा जन्म

१९९९: इलावेनिल वालारिवन - भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक

१९५८: अर्शद अयुब - भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक

१९४८: तपन कुमार सरकार - भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शैक्षणिक (निधन: १२ मार्च २०२१)

१९३०: ए. पी. वेंकटेश्वरन - भारतीय राजकारणी (निधन: ३ सप्टेंबर २०१४)

१९२९: विद्या चरण शुक्ला - भारतीय राजकारणी (निधन: ११ जुन २०१३)

१९१८: जे. पी. वासवानी - आध्यात्मिक गुरू

१९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे - कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (निधन: १७ फेब्रुवारी १९७८)

१८७७: रविशंकर शुक्ला - मध्य प्रदेशचे १ले मुख्यमंत्री (निधन: ३१ डिसेंबर १९६५)

१८७६: पिंगाली वेंकय्या - भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (निधन: ४ जुलै १९६३)

१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे - बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक (निधन: १६ जून १९४४)

आज यांची पुण्यतिथी

१९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल - अमेरिकन शास्रज्ञ, टेलिफोनचे संशोधक (जन्म: ३ मार्च १८४७)

१७८१: सखारामबापू बोकील - पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trump and Putin meeting : युक्रेनचे युद्ध संपणार? दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष भेटण्याच्या तयारीत

Sayaji Shinde : सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे पुन्हा रंगभूमीवर, दिसणार 'या' नाटकामध्ये

Rainforest Challenge India : गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत सिरीलने '४बाय ४ मॉडिफाइल्ड' विभागात पटकावला दुसरा क्रमांक

Nagpur : नागपुरात उड्डाणपुलाच्या खोदकामावेळी सापडला सांगाडा