लोकशाही स्पेशल

दिनविशेष 2 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 2 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 2 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.

१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

१९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.

१९३९: दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.

१९२०: म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.

१९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.

आज यांचा जन्म

१९८८: इशांत शर्मा - भारतीय क्रिकेटपटू

१९८८: इश्मीत सिंग - भारतीय गायक (निधन: २९ जुलै २००८)

१९७१: पवन कल्याण - भारतीय अभिनेते आणि राजकारणी

१९६५: पार्थो सेन गुप्ता - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९४१: साधना - चित्रपट अभिनेत्री

१९२४: स्वामी स्वरूपानंद सरस्वती - भारतीय धार्मिक गुरू आणि शंकराचार्य (निधन: ११ सप्टेंबर २०२२)

१८८६: श्रीपाद महादेव माटे - साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक (निधन: २५ डिसेंबर १९५७)

१८३८: भक्तिविनाडो ठाकूर - भारतीय गुरु आणि तत्वज्ञ (निधन: २३ जून १९१४)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: बंबा बक्या - भारतीय पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑक्टोबर १९८०)

२०२२: टी. व्ही. शंकरनारायणन - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म भूषण (जन्म: ७ मार्च १९४५)

२०२२: रामवीर उपाध्याय - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म: १ ऑगस्ट १९५७)

२०१४: गोपाल निमाजी वाहनवती - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ७ मे १९४९)

२०११: श्रीनिवास खळे - संगीतकार (जन्म: ३० एप्रिल १९२६)

१९९९: डी. डी. रेगे - चित्रकार व लेखक (जन्म: १७ डिसेंबर १९११)

१९९०: नरहर शेषराव पोहनेरकर - निबंध, लघुकथा व कादंबरीकार (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)

१९९०: न. शे. पोहनेरकर - मराठवाड्याचा चालता-बोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)

१९७६: वि. स. खांडेकर - भारतीय मराठी कादंबरीकार - पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १९ जानेवारी १८९८)

१९६०: डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर - वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा