Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : नील आर्मस्ट्रॉंगचे चंद्रावर पाऊल

नसीरुद्दीन शाह यांचा जन्म, बटुकेश्वर दत्त यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरु नका.

आज काय घडले

  • १९०८ मध्ये बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली.

  • १९६९ मध्ये अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवले. चंद्रावर पाऊल ठेवणारे ते पहिले मानव ठरले. त्यानंतर लगेच दुसरे अमेरिकन अंतराळवीर एडविन एल्ड्रीन हे चंद्रावर उतरणारे दुसरे मानव ठरले.

  • १९७६ मध्ये मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहीत अंतराळयान उतरले.

आज यांचा जन्म

  • माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा १९१९ मध्ये जन्म झाला. त्यांनी २ मे १९५३ रोजी शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर एव्हरेस्ट सर केले होते.

  • बनारस घराण्यातील प्रसिद्ध भारतीय तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा १९२१ मध्ये जन्म झाला.

  • हिंदी चित्रपट सृष्टीत ‘जुबली स्टार’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते राजेंद्रकुमार यांचा १९२९ मध्ये जन्म झाला. त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाला आहे.

  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते व रंगमंच कलाकार नसीरुद्दीन शाह यांचा १९४९ मध्ये जन्म झाला. वयाच्या १४व्यापासून त्यांनी अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती.

आज यांची पुण्यतिथी

  • कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे १९४३ मध्ये निधन झाले. सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्यांकडे होते.

  • थोर क्रांतिकारक व भगत सिंह यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांचे १९६५ मध्ये निधन झाले. १९२९ मध्ये नवी दिल्लीमधील केंद्रीय विधिमंडळात त्यांनी भगत सिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका गीता दत्त यांचे १९३२ मध्ये निधन झाले. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्या त्या पत्नी होत्या.

  • भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश व भारतातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या ब्रिटीश महिला अन्ना चांडी यांचे १९९६ मध्ये निधन झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :19 वर्षानंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश