Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनची निर्मिती पूर्ण

लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म, रघुनाथ गोखले यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात. एकाचवेळी रडतात. एकाचवेळी झोपतात. ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

आज जागतिक शरणार्थी दिन : आजचा दिवस हा जगभरातील निर्वासितांच्या परिस्थितीविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्राने सन २००० पासून याची सुरुवात केली.

आज काय घडले

  • १८८७ मध्ये इंग्रज अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनची निर्मिती पूर्ण केले. त्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आले.

  • १८९९ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

  • १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती व पुरवठा करणारी ही कंपनी आहे.

आज यांचा जन्म

  • किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा १८६९ मध्ये जन्म झाला. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी कारखाना काढला तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापन केली.

  • माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू व गोलंदाज तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा १९३९ मध्ये जन्म झाला. १९५९ ते १९६८ या काळात ते भारतीय संघात होते.

  • पद्मश्री पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार आणि कवी विक्रम सेठ यांचा १९५२ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय महिला कसोटी व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देविका पळशीकर यांचा १९७६ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. कोट्टरलाकोटा रंगधामा राव यांचे १९७२ मध्ये निधन झाले.

  • भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉ. सलीम अली यांचे १९८७ मध्ये निधन झाले. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला.

  • महाराष्ट्रीयन मराठी शायरीचे जनक वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर यांचे १९९७ मध्ये निधन झाले.

  • नाट्य व चित्रपट अभिनेते चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे २००८ मध्ये निधन झाले. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ‘पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा