Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : लॉर्डसवर पहिला क्रिकेट सामना

चंदू बोर्डे यांचा जन्म, राजा राजवाडे यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभुती येते.

आज काय घडले

  • १८८४ मध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्डसच्या मैदानावर पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देशाच्या क्रिकेट संघामध्ये झाला.

  • १९२५ मध्ये अमेरिकेत उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड करण्यात आला.

  • १९६० मध्ये सिरीमाओ बंदरनायके श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.

आज यांचा जन्म

  • ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचा १९११ मध्ये जन्म झाला.

  • गीतकार आनंद बक्षी यांचा १९३० मध्ये जन्म झाला. १९६४ पासून २००४ या कालावधीत हजारो गीतांचे गायन त्यांनी केले. फिल्मफेअर पुरस्कारासाठी ४० वेळा त्यांचे नामांकन झाले.

  • मराठी लेखक व सांस्कृतिक संशोधक डॉ. रा. चि. ढेरे यांचा १९३० मध्ये जन्म झाला.

  • पद्मभूषण व अर्जुन पुरस्काराने सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचा १९३४ मध्ये जन्म झाला. ते भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष होते.

  • भारतीय क्रिकेट संघातील सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा १९४७ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • महाराष्ट्रीयन मराठी बखर वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. र. वी. हेरवाडकर यांचे १९९४ मध्ये निधन झाले.

  • संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे १९९५ मध्ये निधन झाले.

  • साहित्यिक राजा राजवाडे यांचे १९९७ मध्ये निधन झाले.

  • मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे २००२ मध्ये निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या मुघल-ए-आझम चित्रपटाचे पोस्टरदेखील त्यांनी रंगवले होते.

  • हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका गंगूबाई हनगळ यांचे २००९ मध्ये निधन झाले. संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी आईकडून घेतले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा