लोकशाही स्पेशल

दिनविशेष 21 जुलै 2023 : द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या १५व्या राष्ट्राध्यक्षा म्हणून निवड

सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 21 July 2023 : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 21 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: द्रौपदी मुर्मू - यांची भारताच्या १५व्या राष्ट्राध्यक्षा म्हणून निवड.

२०१२: एर्डन एरुस - यांनी जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण केली.

२००८: राम बरन यादव - यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आले.

२००२: वर्ल्ड कॉम - कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

१९८३: अंटार्क्टिका - खंडातील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस यापृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.

१९७०: अस्वान हाय धरण, इजिप्त - हे जगातील सर्वात मोठे बंधारा धरण ११ वर्षांच्या बांधकामानंतर पूर्ण झाले.

१९६१: मर्क्युरी-रेडस्टोन ४ मिशन - गुस ग्रिसम हे अंतराळात जाणारे दुसरे अमेरिकन बनले.

१९५९: एनएस सवाना - हे पहिले अणुऊर्जेवर चालणारे मालवाहू जहाज कार्यरत झाले.

१९५४: पहिले इंडोचिनी युद्ध - जिनिव्हा परिषदेने व्हिएतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले.

१९२५: माल्कम कॅम्पबेल - हे जमिनीवरील १५० माइल्स प्रति तास (150mph - 241kmph) वेगाचा टप्पा पार करणारे पहिले व्यक्ती बनले.

१९०४: लुई रिगोली - हे जमिनीवरील १०० माइल्स प्रति तास (100mph - 161kmph) वेगाचा टप्पा पार करणारे पहिले व्यक्ती बनले.

इ.स.पू. ३५६: एफिसस आर्टेमिस - मंदिर नष्ट झाले.

आज यांचा जन्म

१९६८: आदित्य श्रीवास्तव - भारतीय अभिनेते

१९६०: अमर सिंग चमकिला - भारतीय गायक-गीतकार (निधन: ८ मार्च १९८८)

१९४७: चेतन प्रतापसिंग चौहान - भारतीय क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: १६ ऑगस्ट २०२०)

१९४५: बॅरी रिचर्ड्स - दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू

१९३४: चंदू बोर्डे - भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष - पद्म भूषण, पद्मश्री, अर्जुना पुरस्कार

१९३०: रा. चिं. ढेरे - भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक

१९२०: आनंद बक्षी - गीतकार (निधन: ३० मार्च २००२)

१९११: उमाशंकर जोशी - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १९ डिसेंबर १९८८)

१९१०: वि. स. पागे - स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक (निधन: १६ मार्च १९९०)

१८५३: शंकर बाळकृष्ण दीक्षित - ज्योतिर्विद (निधन: २७ एप्रिल १८९८)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: लालजी टंडन - मध्य प्रदेशचे २२वे राज्यपाल (जन्म: १२ एप्रिल १९३५)

२००९: गंगूबाई हनगळ - किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: ५ मार्च १९१३)

२००२: गोपाळराव बळवंतराव कांबळे - मराठी चित्रकार

२००१: शिवाजी गणेशन - दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ ऑक्टोबर १९२८)

१९९७: राजा राजवाडे - साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६)

१९९५: सज्जाद हुसेन - संगीतकार मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७)

१९९४: डॉ. र. वि. हेरवाडकर - मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक

१९२०: सरदादेवी - भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: २२ डिसेंबर १८५३)

१९०६: व्योमेश चन्‍द्र बनर्जी - भारतीय कॉंग्रेसचे सह-संस्थापक आणि पहिले अध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १८४४)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...