Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : सुभाषचंद्र बोस काँग्रेसमधून बाहेर

अमरीश पुरी यांचा जन्म, रामा नारायणन यांचे निधन

Published by : Team Lokshahi

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

सुविचार

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्की गाठतात.

आज काय घडले

  • १६३३ मध्ये गॅलेलिओ गॅलिली यांनी पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल ३५० वर्षांनी व्हॅटीकन चर्चने आपली चूक मान्य केली.

  • १८९७ मध्ये पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.

  • १९४० मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

  • १९९४ मध्ये महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकऱ्यात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्यात आले.

  • २००७ मध्ये अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण केले. सर्वाधिक काळ अंतराळात राहून त्या पृथ्वीवर परत आल्या.

आज यांचा जन्म

  • चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते बाबूराव पेंढारकर यांचा १८९६ मध्ये जन्म झाला. सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

  • महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा १९०८ मध्ये जन्म झाला.

  • सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता अमरीश पुरी यांचा १९३२ मध्ये जन्म झाला. १९७० ते २००५ या काळात अमरीश पुरी यांनी हिंदी भाषेसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

आज यांची पुण्यतिथी

  • माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू सदाशिव गणपतराव शिंदे यांचे १९५५ मध्ये निधन झाले.

  • चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे १९९४ मध्ये निधन झाले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामा नारायणन यांचे २०१४ मध्ये निधन झाले. ३६ वर्षांत त्यांनी १२५ चित्रपट काढले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक