Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : जगातील पहिल्या टेस्ट ट्युबीचा जन्म

सोमनाथ चटर्जी यांचा जन्म, बी. आर. इशारा यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वत:जवळ ठेवा.

आज काय घडले

  • १६४८ मध्ये आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने शहाजीराजे यांना कैद केले.

  • १९७८ मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.

  • १९८४ मध्ये सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.

  • २००७ मध्ये प्रतिभाताई पाटील देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.

आज यांचा जन्म

  • भारतातील आयरिश वन्यजीवतज्ज्ञ व लेखक जिम कार्बेट यांचा १८७५ मध्ये जन्म झाला.

  • संगीतकार व गायक सुधीर फडके यांचा १९१९ मध्ये जन्म झाला. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले.

  • मराठी कवी विश्वनाथ वामन बापट यांचा १९२२ मध्ये जन्म झाला. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता.

  • लोकसभेचे माजी सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा १९२९ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे १८८० मध्ये निधन झाले.

  • महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक व लष्करी शिक्षणाचे प्रसारक कॅप्टन शिवरामपंत दामले यांचे १९७७ मध्ये निधन झाले.

  • चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे २०१२ मध्ये निधन झाले. १९६४ ते १९९६ दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा