Dinvishesh  Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : देशात आणीबाणीची घोषणा

साई ताम्हनकरचा जन्म, मायकेल जॅक्शनचे निधन

Published by : Team Lokshahi

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफरसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली. २६ जून १९७५ पासून २१ मार्च १९७७ सालापर्यंत २१ महिन्यांच्या काळात ही आणीबाणी लागू होती.

सुविचार

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

आज काय घडले

  • १९१८ मध्ये कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा निर्णय जरी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्वाचा टप्पा मानला जातो.

  • १९७५ मध्ये भारताचे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफरसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली. २६ जून १९७५ पासून २१ मार्च १९७७ सालापर्यंत २१ महिन्यांच्या काळात ही आणीबाणी लागू होती.

  • १९८३ मध्ये एकदिवशी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ४३ धावाने पराभव केला. भारताने पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली.

  • २००० मध्ये मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांच्या जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा ते पहिले हिन्दी चित्रपट अभिनेता ठरले.

आज यांचा जन्म

  • महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा १८६९ मध्ये जन्म झाला. ब्रिटीश अधिकारी रँड याची हत्या चाफेकर बंधूंनी केली होती.

  • स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांचा १९०८ मध्ये जन्म झाला. त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली.

  • प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार मदनमोहन यांचा १९२४ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा १९३१ मध्ये जन्म झाला. २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळात ते पंतप्रधान होते.

  • हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा १९७४ मध्ये जन्म झाला. १९९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून करिश्मा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले होते.

  • परमवीर चक्र सन्मानित भारतीय लष्कर सैनिक मनोज कुमार पांडेय यांचा १९७५ मध्ये जन्म झाला. कारगिल युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले.

  • अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा १९८६ मध्ये जन्म झाला. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर यांची ओळख आहे.

आज यांची पुण्यतिथी

  • बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे १९२२ मध्ये निधन झाले.

  • मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे २००० मध्ये निधन झाले.

  • अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक आणि अभिनेता मायकेल जॅक्सन यांचे २००९ मध्ये निधन झाले. पॉपचा राजा असे त्यांना संबोधले जात होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट