Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : सिमला परिषदेच्या मसुदा तयार

पी.व्ही.नरसिंहराव यांचा जन्म, प्रशांतचंद्र महालनोबीस यांची पुण्यतिथी

Published by : Team Lokshahi

सुविचार

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

आज काय घडले

  • १९७२ मध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध समाप्तीनंतर सिमला परिषदेचा मसुदा तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला.

  • १९९७ मध्ये माइक टायसन यांनी मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावा घेऊन तुकडा तोडला. यामुळे त्यांना निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.

  • १९९८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने १९४८ साली मानवी संरक्षणासाठी घेतलेल्या मानवी हक्काविषयी सार्वत्रिक जाहीरनाम्यास पन्नास वर्ष पूर्ण झाली.

आज यांचा जन्म

  • भारताचे ९वे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा १९२१ मध्ये जन्म झाला. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान कारकिर्दीत झाली.

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, कलासमीक्षक बाबुराव नारायण सडवेलकर यांचा १९२८ मध्ये जन्म झाला.

  • साहित्यिक समीक्षक, दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा १९३७ मध्ये जन्म झाला. त्यांनी अनेक कवी-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.

  • पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित नेमबाज जसपाल राणा यांचा १९७६ मध्ये जन्म झाला. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ६०० पेक्षा जास्त पदक जिंकले आहेत.

आज यांची पुण्यतिथी

  • प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे १९७२ मध्ये निधन झाले.

  • उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे २००० मध्ये निधन झाले.

  • भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे २००९ मध्ये निधन झाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा