Dinvishesh 29 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 29 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
१९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
आज यांचा जन्म
१९७४: ट्विंकल खन्ना - अभिनेत्री
१९४२: राजेश खन्ना - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण (निधन: १८ जुलै २०१२)
१९१७: रामानंद सागर - हिंदी चित्रपट निर्माते (निधन: १२ डिसेंबर २००५)
१९०४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा - कन्नड लेखक व कवी (निधन: ११ नोव्हेंबर १९९४)
१९००: दिनानाथ मंगेशकर - शास्त्रीय गायक (निधन: २४ एप्रिल १९४२)
१८४४: व्योमेश चन्द्र बनर्जी - भारतीय कॉंग्रेसचे सह-संस्थापक आणि पहिले अध्यक्ष (निधन: २१ जुलै १९०६)
आज यांची पुण्यतिथी
२०१५: ओमप्रकाश मल्होत्रा - पंजाबचे २५ वे राज्यपाल (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)
२०१४: हरी हरिलेला - भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी (जन्म: १० ऑगस्ट १९२२)
२०१३: जगदीश मोहंती - भारतीय लेखक आणि अनुवादक (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
१९७१: दादासाहेब गायकवाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी
१९६७: पंडीत औंकारनाथ ठाकूर - भारतीय ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार - पद्मश्री (जन्म: २४ जून १८९७)