लोकशाही स्पेशल

दिनविशेष 30 जानेवारी 2024 : महात्मा गांधी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 30 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 30 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९९: पं. रविशंकर यांना भारतरत्न जाहीर.

१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.

१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

१९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.

आज यांचा जन्म

१९४९: डॉ. सतीश आळेकर - नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते - साहित्य अकादमी पुरस्कार

१९३०: समर बॅनर्जी - भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू (निधन: २० ऑगस्ट २०२२)

१९२९: रमेश देव - हिंदी, मराठी अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक

१९११: पं. गजाननबुवा जोशी - शास्त्रीय गायक (निधन: २८ जून १९८७)

आज यांची पुण्यतिथी

२००४: रमेश अणावकर - गीतकार

२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर - मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते

१९९६: गोविंदराव पटवर्धन - हार्मोनियम वव ऑर्गन वादक

१९९१: जॉन बार्डीन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते - नोबेल पारितोषिक (जन्म: २३ मे १९०८)

१९४८: महात्मा गांधी - भारतीय राष्ट्रपिता (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा