लोकशाही स्पेशल

दिनविशेष 30 जून 2023 : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 30 June 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 30 जून या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं

आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

२०२२: एकनाथ शिंदे - यांनी महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

२०१९: डोनाल्ड ट्रम्प - उत्तर कोरिया देशाला भेट देणारे हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले.

२००२: फुटबॉल विश्वकप - ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

१९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

१९६६: नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन - अमेरिकेतील सर्वात मोठ्या स्त्रीवादी संस्थेची स्थापना.

१९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

१९४४: रामशास्त्री - चित्रपट प्रकाशित झाला.

१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.

१८५९: चार्ल्स ब्लांडिन - यांनी नायगारा धबधबा एकादोरीवरून कसरत करीत पार केला.

आज यांचा जन्म

१९७३: दोड्डा गणेश - भारतीय क्रिकेटपटू

१९७०: विनायक मेटे - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (निधन: १४ ऑगस्ट २०२२)

१९६९: सनत जयसूर्या - श्रीलंकेचे क्रिकेटपटू

१९६६: माइक टायसन - अमेरिकन मुष्टीयोद्धा

१९५९: संदीप वर्मा - भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी

१९५८: अरविंद गिरी - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: ६ सप्टेंबर २०२२)

१९४५: संजीत बंकर रॉय - भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ता - पद्मश्री, जमनालाल पुरस्कार

१९३४: चिंतामणी नागेश रामचंद्र राव - भारतीय रसायनशास्त्रज्ञ

१९२८: कल्याणजी वीरजी शहा - ज्येष्ठ संगीतकार - पद्मश्री (निधन: २४ ऑगस्ट २०००)

१९१८: नागार्जुन - भारतीय हिंदी कवी (निधन: ५ नोव्हेंबर १९९८)

आज यांची पुण्यतिथी

२०२१: राज कौशल - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: १५ ऑगस्ट १९७०)

२००७: साहिबसिंह वर्मा - दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री (जन्म: १५ मार्च १९४३)

१९९९: कृ. ब. निकुंब - मराठी कवी

१९९७: राजाभाऊ साठे - शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक

१९९४: बाळ कोल्हटकर - नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)

१९९२: डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे - साहित्यिक, वक्ते समीक्षक

१९१७: दादाभाई नौरोजी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावलं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला