Dinvishesh 4 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 4 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००८: बराक ओबामा - हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले कृष्णवर्णीय व आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे पहिले व्यक्ती बनले.
२००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन - या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.
१९७३: नेदरलँड्स - देशात १९७३ च्या तेल संकटामुळे पहिला कार-मुक्त रविवार अनुभवला. महामार्ग फक्त सायकलस्वार आणि रोलर स्केटर वापरतात.
१९७०: साल्वाडोर अलेंडे - यांनी चिलीचे अध्यक्ष म्हणून पद स्वीकारले, ते खुल्या निवडणुकांद्वारे लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ति बनले.
१९६२: ऑपरेशन फिशबोल - अमेरिकेतिल अण्वस्त्र चाचणी मालिकेचा शेवट.
१९५२: राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NSA) - अमेरिकेतिल संस्थेची स्थापना.
१९४८: बाबासाहेब आंबेडकर - अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.
१९२४: नेली टेलो रॉस - या अमेरिकेच्या गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या.
१९२२: पिरॅमिडम - तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.
१९२१: हारा ताकाशी - जपानचे पंतप्रधान यांची टोकियो येथे हत्या.
१८९६: डेक्कन सभा - पुण्यात स्थापना.
१८९०: शहर आणि दक्षिण लंडन रेल्वे - लंडनची पहिली खोल-भूयारी ट्यूब रेल्वे सुरु झाली.
१८४७: सर जेम्स यंग सिम्पसन - स्कॉटिश वैद्य यांनी क्लोरोफॉर्मचे भूल देणारे गुणधर्म शोधून काढले.
१७३७: टिएट्रो डी सॅन कार्लो - युरोपमधील सर्वात जुने कार्यरत ऑपेरा हाऊस, इटलीतील नेपल्स येथे सुरु झाले.
१४९३: ख्रिस्तोफर कोलंबस - लीवर्ड बेट आणि पोर्तो रिको येथे पोहोचले
आज यांचा जन्म
१९८६: सुहास गोपीनाथ - भारतीय उद्योगपती, ग्लोबल इंक. कंपनीचे संस्थापक
१९८६: सुहास गोपीनाथ - भारतीय उद्योजक
१९७१: तब्बू - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५५: अल्हाज मौलाना घौसवी शहा - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान
१९३४: विजया मेहता - भारतीय दिग्दर्शिका
१९३०: रंजीत रॉय चौधरी - भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - पद्मश्री (निधन: २७ ऑक्टोबर २०१५)
१९२९: जयकिशन पांचाळ - भारतीय संगीतकार, शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (निधन: ६ ऑक्टोबर १९७१)
१९२९: शकुंतला देवी - भारतीय गणितज्ञ (निधन: २१ एप्रिल २०१३)
१९२५: ऋत्विक घटक - भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (निधन: ६ फेब्रुवारी १९७६)
१८९७: जानकी अम्माल - भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ (निधन: ४ फेब्रुवारी १९८४)
१८९४: अप्पासाहेब पटवर्धन - भारतीय समाजसुधारक, कोकणचे गांधी (निधन: १० मार्च १९७१)
१८८४: जमनालाल बजाज - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (निधन: ११ फेब्रुवारी १९४२)
१८७१: शरदचंद्र रॉय - भारतीय मानववंशशास्त्रज्ञ
१८४५: वासुदेव बळवंत फडके - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पहिले सशस्त्र क्रांतिकारक (निधन: १७ फेब्रुवारी १८८३)
आज यांची पुण्यतिथी
२०११: दिलीप परदेशी - भारतीय नाटककार व साहित्यिक
२००५: स. मा. गर्गेपुणे - भारतीय इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार
१९९१: पुरुषोत्तम बापट - भारतीय बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक (जन्म: १२ जून १८९४)
१९७०: पं. शंभू महाराज - भारतीय लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक