लोकशाही स्पेशल

दिनविशेष 5 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 5 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 5 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२०: राम मंदिर, अयोध्या - सर्वोच्च न्यायालयाच्या विवादित जमिनीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले.

२०१९: भारत - जम्मू आणि काश्मीर या परदेशाला राज्यचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर, व लडाख असे विभाजन करण्यात आले.

१९६५: १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध - पाकिस्तानी सैनिकांनी स्थानिकांचा वेष घालून घुसखोरी केल्यामुळे युद्ध सुरु झाले.

१९६३: शीतयुद्ध - आंशिक आण्विक चाचणी बंदी करार: अमेरिका, युनायटेड किंगडम आणि सोव्हिएत युनियनने स्वाक्षरी केली.

१९०१: पीटर ओ'कॉनर - यांनी २४ फूट ११.७५ इंच (७.६१३७ मीटर) लांब उडीचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

१८८४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, न्यूयॉर्क, अमेरिका - याची कोनशिला घातली गेली.

००७०: दुसरे मंदिर, जेरुसलेम - येथे लागलेली आग विझली.

इ.स.पू. २५: हान साम्राज्य, चीन - पुनर्स्थापना झाली.

आज यांचा जन्म

१९८७: जेनेलिया डिसोझा - भारतीय अभिनेत्री

१९७४: काजोल - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री

१९६९: वेंकटेश प्रसाद - जलदगती गोलंदाज

१९५०: महेंद्र कर्मा - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २५ मे २०१३)

१९३३: विजया राजाध्यक्ष - लेखिका व समीक्षिका

१९३०: नील आर्मस्ट्राँग - चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (निधन: २५ ऑगस्ट २०१२)

१९१५: शिवमंगल सिंग सुमन - भारतीय कवी आणि शैक्षणिक (निधन: २७ नोव्हेंबर २००२)

१८९०: दत्तो वामन पोतदार - भारतीय इतिहासकार, लेखक, वक्ते - पद्म विभूषण (निधन: ६ ऑक्टोबर १९७९)

१८५८: वासुदेवशास्त्री खरे - इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (निधन: ११ जून १९२४)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: देबी घोसाल - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: १ नोव्हेंबर १९३४)

२०२२: गोरिमा हजारिका - भारतीय नृत्यांगना

२०२२: नरेंदर थापा - भारतीय फुटबॉलपटू (जन्म: २२ सप्टेंबर १९६४)

२०१४: चापमॅन पिंचर - भारतीय-इंग्रजी इतिहासकार (जन्म: २९ मार्च १९१४)

२००१: ज्योत्स्‍ना भोळे - गानसम्राज्ञी, गायिका आणि अभिनेत्री - लता मंगेशकर पुरस्कार (जन्म: ११ मे १९१४)

२०००: लाला अमरनाथ भारद्वाज - स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार - पद्म भूषण (जन्म: ११ सप्टेंबर १९११)

१९९७: के. पी. आर. गोपालन - स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते

१९९२: भगत पूरण सिंग - भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी आणि परोपकारी - पद्मश्री (जन्म: ४ जून १९०४)

१९९२: अच्युतराव पटवर्धन - स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला