लोकशाही स्पेशल

दिनविशेष 6 डिसेंबर 2023 : महापरिनिर्वाण दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 6 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 6 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

१९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.

१९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.

१९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

१९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

१९१७: फिनलँड रशियापासून स्वतंत्र झाला.

१८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.

१८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

१७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

आज यांचा जन्म

१९८५: आर. पी. सिंग - भारतीय क्रिकेटपटू

१९४८: सुचेता भिडे-चापेकर - भरतनाट्यम नृत्यांगना

१९४५: शेखर कपूर - अभितेने

१९३२: कमलेश्वर - भारतीय हिंदी लेखक - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: २७ जानेवारी २००७)

१९२३: वसंत सबनीस - लेखक व पटकथाकार (निधन: १५ ऑक्टोबर २००२)

१९१६: जयराम शिलेदार - गंधर्व भूषण (निधन: ६ नोव्हेंबर १९९२)

१८६१: नारायण वामन टिळक - रेव्हरंड (निधन: ९ मे १९१९)

१८५३: हरप्रसाद शास्त्री - संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (निधन: १७ नोव्हेंबर १९३१)

१७३२: जनरल वॉरन हेस्टिंग्ज - भारताचे पहिले गव्हर्नर (निधन: २२ ऑगस्ट १८१८)

आज यांची पुण्यतिथी

२०१३: नेल्सन मंडेला - दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी - भारतरत्न, नोबेल पुरस्कार (जन्म: १८ जुलै १९१८)

१९७६: क्रांतिसिंह नाना पाटील - स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते (जन्म: ३ ऑगस्ट १९००)

१९७१: कमलाकांत वामन केळकर - भारतीय भूविज्ञान वैज्ञानिक (जन्म: १ जानेवारी १९०२)

१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - भारतरत्न (मरणोत्तर) (जन्म: १४ एप्रिल १८९१)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन