लोकशाही स्पेशल

आज काय घडले : स्वातंत्र्यवीर सावरकरांची समुद्रात उडी

सौरव गांगुली यांचा जन्म, नानासाहेब धर्माधिकारी यांची पुण्यतिथी

Published by : Team Lokshahi

सुविचार

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की, तुम्ही किती असामान्य आहात.

आज काय घडले

  • १४९७ मध्ये वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला. आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग त्यांनी शोधला.

  • १९१० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मोरिया’ या जहाजातून फ्रान्समधील मॉर्सेलिसच्या समुद्रात उडी घेतली. मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. पण भाषेच्या अडचणीमुळे त्यांना पुन्हा अटक झाली.

  • २००६ मध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • २०११ साली भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी तयार करण्यात आली.

आज यांचा जन्म

  • मराठ्यांचा आद्य इतिहासकार जेम्स ग्रँट डफ १७८९ मध्ये जन्म झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या मराठ्यांचा इतिहास लिहिला.

  • भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य, पश्चिम बंगाल राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले ज्योती बसू यांचा १९१४ मध्ये जन्म झाला. ते १९७७ पासून २००० पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.

  • साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा १९१६ मध्ये जन्म झाला. अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत म्हणून त्यांची ओळख होती.

  • आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा १९४९ मध्ये जन्म झाला.

  • बॉलीवूड अभिनेत्री नीतू सिंग यांचा १९५८ मध्ये जन्म झाला. बाल-कलाकार म्हणून काम केल्यानंतर नीतू सिंग यांनी ६० पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.

  • भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा १९७२ मध्ये जन्म झाला. भारताकडून सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा सौरव गांगुली यांनी काढल्या आहेत.

आज यांची पुण्यतिथी

  • मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे बा.भ. बोरकर उर्फ बाकीबाब बोरकर यांचे १९८४ मध्ये निधन झाले. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे १९९४ मध्ये निधन झाले.

  • प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे २००१ मध्ये निधन झाले.

  • संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे २००३ मध्ये निधन झाले.

  • भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचे २००७ मध्ये निधन झाले. १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान ते पंतप्रधान होते.

  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे २००८ मध्ये निधन झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना