लोकशाही स्पेशल

दिनविशेष 8 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 8 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 8 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: नेताजी सुभाषचंद्र बोस - यांच्या २८ फूट उंच, इंडिया गेट, दिल्ली येथील पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले.

२००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.

२०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

१९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

१९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.

१९४४: दुसरे महायुद्ध - लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.

१९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.

१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना साताऱ्यातील गेंडा माळावर फाशी

आज यांचा जन्म

१९३३: आशा भोसले - जगप्रसिद्ध पार्श्वगायिका - पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार

१९२६: भूपेन हजारिका - भारतीय संगीतकार व गायक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ५ नोव्हेंबर २०११)

१८८७: स्वामी शिवानंद सरस्वती - योगी व आध्यात्मिक गुरू (निधन: १४ जुलै १९६३)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: कमल नारायण सिंग - भारताचे २२वे सरन्यायाधीश (जन्म: १३ डिसेंबर १९२६)

२०१०: मुरली - तामिळ अभिनेते (जन्म: १९ मे १९६४)

१९९७: कमला सोहोनी - पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (जन्म: १८ जून १९११)

१९९१: वामन कांत - भारतीय कवी (जन्म: ६ ऑक्टोबर १९१३)

१९८२: शेख अब्दुल्ला - जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते (जन्म: ५ डिसेंबर १९०५)

१९६०: फिरोझ गांधी - इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)

१९३९: स्वामी अभेदानंद - भारतीय तत्त्वज्ञ, रामकृष्ण वेदान्ता मठाचे संस्थापक (जन्म: २ ऑक्टोबर १८६६)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य