लोकशाही स्पेशल

Dussehra 2021 : जाणून घ्या दसऱ्या दिवशी का वाटली जातात आपट्याची पानं

Published by : Lokshahi News

आज विजयादशमी. चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्री साजरी केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो.


या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचे पूजन केले जाते. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही आहे.

दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत.दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला आणि या विजयाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. याच दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला.

आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व


दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत.वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी.

आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा


दसर्‍याच्या दिवशी आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने 'सोने' म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. विजयी वीरहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवून मोठ्या माणसांना आणि देवाला नमस्कार करत असत. या घटनेची स्मृती म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट