लोकशाही स्पेशल

लोकशाहीत देशातील पहिला तृतीयपंथी रिपोर्टर

Published by : Shweta Chavan-Zagade

माध्यम क्षेत्रात विविध प्रयोग करणाऱ्या Youngest मराठी HD न्यूज चॅनल "लोकशाही"ने तृतीयपंथीला माध्यम क्षेत्रात काम करण्याची संधी दिली आहे. पहिली किन्नर फोटोजर्नलिस्ट म्हणून ओळख असलेली झोया थॉमस लोबो (zoya loboi) आता लोकशाहीच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडणार आहे. देशातील पहिली तृतीयपंथी (transgender) रिपोर्टर म्हणून झोयाची आता ओळख होणार आहे.

झोया लोबो आता Youngest मराठी HD न्यूज चॅनल लोकशाहीत रुजू झाली आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल करण्याचा मानस झोयाने व्यक्त केला आहे. झोयाने फोटोजर्नालिस्ट म्हणून देशाचं लक्ष वेधून घेतलं होते. तृतीयपंथीय समुदायांमध्ये वावरत असताना कॅमेरा घेऊन आपल्या नजरेतून ती जग टिपू लागली. आता कॅमेरासमोर येऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात महत्वाची भूमिका बजवण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

काय म्हणते झोया
छक्का, हिजडा, किन्नर अशा कित्येक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व धुतकारल्या जाणाऱ्या माझ्यासारख्या कित्येकांची कहाणी घेऊन मी येत आहे.

मी झोया लोबो मला एक तृतीयपंथी समजा किंवा मग आता लोकशाहीची रिपोर्टर. मी येणार आहे, तुमचे डोळे उघडायला, आम्हीही माणूस आहोत, हे परत परत सांगायला.

तुमच्या महासत्ता आणि विकसित भारतात आजही होणारी तृतीयपंथीयांची परवड मांडण्यासाठी मी येत आहे. दुरून पाहताना तुम्हाला आमच्याबद्दल होणारे गैरसमज दूर करण्यासाठी मी येत आहे. आमचं नाव काढलं की नाकं मुरडणाऱ्या समाजाला वास्तव दाखविण्यासाठी मी येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा