लोकशाही स्पेशल

Happy Friendship Day Wishes; 'फ्रेंडशिप डे' विश करण्यासाठी स्टेटसवर ठेवा 'हे' सुंदर मॅसेज

मैत्री म्हणजे अतूट नातं जे आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतं हे कोणालाच कळत नाही. मैत्राच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात.

Published by : shweta walge

मैत्री म्हणजे अतूट नातं जे आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतं हे कोणालाच कळत नाही. मैत्राच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात. ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. आपले असे काही जिवलग मित्र आहेत ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटून फ्रेंडशीप डेच्या शुभेच्छा देवू शकत नाही पण डिजीटल माध्यमातून आपण आपल्या शुभेच्छा त्यांच्या पर्यंत नक्कीच पाठवू शकतो. अशाचं तुमच्या दोस्तांना पाठवण्यासाठी काही खास शुभेच्छा कार्ड, वॉलपेपर्स , मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय.

मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे.

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय 
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही!

हेप्पी फ्रेंडशिप डे

जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी!

हेप्पी फ्रेंडशिप डे 

एक भास जो कधीही दुखावत नाही आणि
एक गोड नातं जे कधी संपतच नाही!

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते

हेप्पी फ्रेंडशिप डे

कुठलंही नातं नसताना 
आयुष्यभर साथ देते ती मैत्री! 

हेप्पी फ्रेंडशिप डे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती

Tuljapur Temple : श्री तुळजाभवानी मंदिरातून शस्त्रपूजनातील तलवार गायब? उडाली एकच खळबळ