लोकशाही स्पेशल

Happy Mother’s day: मातृदिन कधीपासून साजरा केला जातोय, कशी झाली सुरुवात?

Published by : Lokshahi News

आई माझा गुरू : आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे. असे साने गुरुजींनी म्हटले आहे. मे महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे 'जागतिक मातृदिन.' आईवर तसे आपण वर्षातील ३६५ दिवस प्रेम करत असतो पण ते प्रेम साजरे करण्याचा जगाने एक दिवस ठरवला आहे. सध्या कोरोनाने आपण घरातच आहोत. आपण कधी नव्हे ते इतके आईच्या जवळ आहोत. ती दररोज किती कामं करते आपल्यासाठी झटते, हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. त्यामुळे तिला थॅक्यू म्हणण्याचा हा दिवस सोडू नका. मुलांकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता निस्सिम प्रेम करणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई! आईच्या उपकारांची परतफेड होऊच शकत नाही. यंदा मदर्स डे सेलिब्रेशन हॉटेलमध्ये जाऊन किंवा पार्टी करून साजरा करू शकत नाही. गेल्या वर्षी प्रमाणाचे लॉकडाउन असल्यामुळे आपण सर्व जण घरातच आहोत. त्यामुळे जेवढा वेळ देता येईल तेवढा आईला द्या.

मदर्स'डेचा काय आहे इतिहास?

मातृदिन हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला. एना जार्विस नावाच्या मुलीने तिच्या आईचे स्मारक बांधले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण, ती तिच्या आईची शेवटची इच्छा होती. नंतर, तिने आईच्या निधनानंतर तीन वर्षे असेच केले आणि त्यानंतर तिने सर्व मातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली आणि हा दिवस अमेरिकेत मातृदिन म्हणून साजरा करण्यात आला.

हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी मोहीमही सुरु केली. मात्र, तिची ही विनंती नाकारली गेली होती. पण, 1941 मध्ये एका प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात आली आणि हे जाहीर करण्यात आलं की आजपासून मे महिन्याचा प्रत्येक दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा