लोकशाही स्पेशल

Hartalika Vrat: हरतालिका व्रताची महती आपल्याला माहित आहे, पण या व्रताला हरतालिका असे नाव का पडले? जाणून घ्या...

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. तसेच गणपती येण्याच्या एक दिवसआधी महिलांकडून हरतालिका व्रत केले जाते. भाद्रपद शुद्ध तृतियेला हरतालिका व्रत केले जाते.

Published by : Team Lokshahi

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. तसेच गणपती येण्याच्या एक दिवसआधी महिलांकडून हरतालिका व्रत केले जाते. भाद्रपद शुद्ध तृतियेला हरतालिका व्रत केले जाते. कुमारिका हे व्रत चांगला पती मिळावा याकरिता करतात तर विवाहित महिला सौभाग्य सदैव राहावे तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास करतात. हे व्रत करत असताना माता पार्वती आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते.

हरतालिकेच्या दिवशी महिला उपवास करतात आणि हा उपवास गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवास सोडतात. हरतालिका या शब्दाचा अर्थ हर म्हणजे हरण ज्याला अपहरण देखील म्हटलं जाते. हरिता म्हणजे जिला अपहरण करून नेले ती तसेच लिका म्हणजे सखी जिला मैत्रिण असे म्हटलं जाते. पौराणिक कथेनुसार हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे आणि त्यामुळे महिला हे व्रत फार निष्ठेने पार पाडतात तसेच या व्रताला महत्त्व ही दिले जाते.

या व्रताला हरतालिका असे नाव का पडले:

पार्वती ही हिमालयाचा राजा हिमवान याची कन्या होती म्हणून तिला पार्वती असे म्हणतात. पार्वतीचा विवाह कोणासोबत होईल या चिंतेत असलेले हिमवान यांच्या समोर एक दिवस नारदमुनी येऊन ठेपले. हिमवान याला पार्वतीसाठी तिला शोभेसा वर निवडायचा होता मात्र तिला शोभेल असा कोणताच वर त्याला भेटला नाही. पार्वती ही हिमालया प्रमाणेच देखण्या रुपाची रुपवान होती त्यामुळे नारदमुनींनी येऊन हिमवानाकडे पार्वतीसोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र पार्वती ही फार आधीपासूनच कैलासधीश शिवशंकरावर भाळली होती.

त्यामुळे नारदमुनींसोबत विवाह करण्यासाठी पार्वतीने नकार दिला. त्यावेळेस पार्वतीच्या मैत्रिणींनी पार्वतीला अपहरण करून एका गुहेत नेले आणि तो दिवस होता भाद्रपद शुक्ल पक्षाचा तृतीय दिवस. त्या दिवशी पार्वतीने गंगा नदीची वाळू आणि मातीपासून शिवलिंग बनवून तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला लग्नाचे वचन दिले. अखेर पार्वती आणि भगवान शंकर याचा विवाह झाला आणि तेव्हापासून हा दिवस हरतालिका तृतीया म्हणून ओळखला जातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा