आपल्याला केसांच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. केस गळणे, कोंडा होणे. तर या सर्व तक्रारींवर उपाय म्हणून आपण शाम्पू, कंडिशनर वापरतो. मात्र या शाम्पू आणि कंडिशनरमध्ये केमिकलचा वापर केलेला असतो आणि हे केमिकल आपल्या केसांसाठी घातक ठरतात.तर या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून आपण स्वतः घरच्या घरी हर्बल शाम्पू तयार करू शकता.
कसा तयार करावा हर्बल शाम्पू?
एक मोठं भांड किंवा पातेल घेऊन त्यात शिकेकाई, सुकवून घेतलेला आवळा आणि रिठे घ्यावेत. यासोबत यात आपण 2 मोठे चमचे मेथिचे दाणे, ब्राम्ही, या गोष्टींचा देखील आपण वापर करू शकतो. या सर्व गोष्टी एकत्र करून यात 2 लिटर पाणी घालून रात्रभर भिजत ठेवावे.
दुसऱ्या दिवशी ते नीट कुस्करून घ्यावे आणि त्यातील शिकेकाईच्या बिया काढून घ्याव्या. नंतर या मिश्रणामध्ये कढीपत्ता, जास्वंद आणि कडुनिंबाची पान घालून उकळून घ्यावे व 10 मिनिटानंतर हे मिश्रण थंड करुन एका कापडातून गाळून घ्यावे. हा शाम्पू थोडा पातळ असणार आहे. मग हा तयार झालेला शाम्पू आपण महिनाभर वापरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेऊ शकतो.
या शाम्पूचा वापर कसा करावा?
अंघोळीच्या अर्धा तास आधी या शाम्पूने केसांच्या मुळांना हलक्या हातानं मालिश करावे. अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करणं टाळावे. साध्या पाण्याने अंघोळ करावी. या शाम्पूने केस स्वच्छ धुतले जातील. या शाम्पूचा वापर 3-4वेळा करावा ज्याने तुमची केस गळती नक्की थांबेल