gautam buddha Team Lokshaihi
लोकशाही स्पेशल

बुद्ध पोर्णिमा का साजरी केली जाते ?

बुद्ध पोर्णिमा म्हणजेच तथागत गोतम बुद्धांचा वाढदिवस.

Published by : Team Lokshahi

बुद्ध पोर्णिमा (buddha purnima )म्हणजेच तथागत गोतम बुद्धांचा वाढदिवस. ते बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते आणि त्यांचे मुळ नाव सिद्धार्थ असे होते. त्यांचा जन्म हा गौतम सत्रात झाला होता म्हणून त्यांना गौतम या नावाने संबोधिले जाते.

गौतम यांचा जन्म पोर्णिमेच्य़ा दिवशी झाला म्हणून त्यांच्या जन्म दिवसाला बुद्ध पोर्णिमा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. बुद्ध पोर्णिमा हा सण वैशाखी पोर्णिमेला साजरा केला जातो. अर्थात मराठी महिन्याच्या दुसर्‍या महिन्यात साजरा केला जातो.

पंचशील तत्व

भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. त्यात त्यांनी जगाला पाच पंचशीले दिली. हिंसा करू नका. चोरी करू नका , व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका आणि मादक पदार्थांचे सेवन करू नका, ही पाच पंचतत्वे त्यांनी जगाला दिली. गौतम बुद्धांनी बोधगयेतील बोधीवृक्षाखाली कठोर तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर गौतम बुद्धांनी आपल्या ज्ञानाने संपूर्ण जगात नवा प्रकाश निर्माण केला.

अशी साजरी करतात बौद्ध पोर्णिमा

बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते.या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रिती-रिवाज आणि संस्कृतीनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस 'वेसक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे.

जगातील दुःख दूर करण्याचा प्रयत्न

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा