लोकशाही स्पेशल

Krishna Janmashtami 2024: कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या या खास शुभेच्छा

भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणूनच दरवर्षी या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.

Published by : Team Lokshahi

भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणूनच दरवर्षी या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. जी कृष्णाष्टमी, अष्टमी रोहिणी, गोकुळाष्टमी, श्री कृष्ण जयंती आणि श्री जयंती म्हणून ओळखली जाते.भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्त कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूचा 8 वा अवतार श्री कृष्ण यांचा जन्म भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला होता. कंसाच्या अत्याचारापासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने माता देवकीचे आठवे अपत्य म्हणून जन्म घेतला. त्यामुळेच दरवर्षी कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या या खास शुभेच्छा

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,

राम नारायणं जानकी वल्लभं,

कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!..

कृष्ण मुरारी नटखट, भारी माखनचोर जन्मला

रोहिनी नक्षत्राला, देवकी नंदाघरी

बाळ तान्हे तेजस्वी, मोहूनी घेती

सर्व मिळूनी पाळणा गाती

कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!..

दह्यात साखर आणि, साखरेत भात,

दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ,

फोडूया हंडी लावूनच उंच थर, जोशात करूया दही हंडीचा थाट,

कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!..

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद

लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास

असा आहे आजचा दिवस खास

कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!..

गोकुळात होता ज्याचा वास,

गोपिकांसोबत ज्याने रसला रास,

यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता,

तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,

कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!..

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा