हिंदू धर्मात श्री गणेश हे आद्यदेवता मानले जातात. प्रत्येक मांगलिक कामापासून ते धार्मिक विधीमध्ये श्री गणेशाची प्रथम पूजा-उपासना केली जाते, त्यानंतर इतर सर्व देवतांची पूजा केली जाते. यंदा 1 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे. गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओखळलं जातं. महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. काही सावर्जनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात. या दिवशी श्रीगणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख-समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते.
गणरायाचे तीन अवतार
गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘ पुष्टिपती विनायक जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘ श्रीगणेश चतुर्थी ‘ म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘ गणेश जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो.
गणेश जयंती का साजरी केली जाते?
माघी गणेश जयंती साजरी करण्याला धार्मिक महत्त्व आहे आणि भारताच्या विविध भागात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. बुद्धीचा स्वामी आणि लाडका गणपती बाप्पा म्हणून त्याच्या भक्तांच्या रूपात सर्वात प्रिय असल्यामुळे भगवान गणेश हे देवता म्हणून पूजनीय आहेत. गणेश जयंती साजरी करण्याची खालील कारणे आहेत.
गणेश जयंती तिथी, मुहूर्त, मंत्र -
गणेश जयंतीच्या दिवशी मध्याह्न गणेश पूजा मुहुर्त सकाळी 11.31 ते दुपारी 1:40 पर्यंत असेल. गणेश भक्तांना बाप्पाची उपासना पूजा करण्यासाठी एकूण 2 तास 2 मिनिटांचा मिळतील. या व्यतिरिक्त वर्जित चंद्र दर्शनची वेळ रात्री 09.02 ते 09.07 या वेळेत आहे.
गणेश जयंतीला या मंत्रांचा जप करा - गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. नंतर एका पाटावर गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. गणरायाला गंगाजलाने स्नान करा आणि नंतर त्यांना धूप, दिवे, फुले, रोली, दुर्वा, सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा. पूजेमध्ये खालील मंत्रांचा जप अवश्य करावा.