mangal pandey Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

मंगल पांडे यांनी या दिवशी बलिदान दिले , जाणून घ्या 8 एप्रिलचा इतिहास

इंग्रजांविरुद्ध देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा पहिला जयघोष करणारे शिपाई मंगल पांडे यांनी दिले

Published by : Team Lokshahi

आजच्या दिवसाला जगाच्या इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. इंग्रजांविरुद्ध देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा पहिला जयघोष करणारे शिपाई मंगल पांडे (Mangal Pandey) यांनी ८ एप्रिल १८५७ रोजी बलिदान दिले. ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) 34 व्या बंगाल इन्फंट्रीचे शिपाई मंगल पांडे यांना या दिवशी फाशी देण्यात आली.

मंगल पांडे यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात 19 जुलै 1827 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे झाला. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध क्रांती सुरू केली आणि 29 मार्च 1857 रोजी बराकपूर येथे इंग्रजांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. ते पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई म्हणून भरती झाले होते, परंतु ब्रिटीश अधिकार्‍यांचा भारतीयांवरचा क्रूरपणा पाहून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उभी केली.

मंगल पांडे हे कलकत्ता येथील बॅरकपूर कॅन्टोन्मेंटमधील (Barrackpore Cantonment) 34 व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीचे (Bengal Native Infantry) पायदळ सैनिक क्रमांक 1446 होते. मंगल पांडेला इंग्रज अधिकार्‍यांवर गोळीबार आणि हल्ले केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

18 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेला फाशी देण्यात येणार होती, पण बराकपूरच्या सर्व जल्लादांनी मंगल पांडेला फाशी देण्यास नकार दिला होता. यानंतर ब्रिटीश सरकारने कलकत्ता (कोलकाता) येथून चार जल्लादांना बोलावले. मंगल पांडेच्या फाशीची बातमी समजल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात अनेक छावण्यांमध्ये संतापाची लाट उसळली, ती पाहता ब्रिटिश राजवटीने मंगल पांडेला १८ एप्रिलला नाही तर दहा दिवसांपूर्वी ८ एप्रिलला फाशी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात