आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जगवू मराठी भाषा
येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जात मराठी,
धर्म मराठी
शान मराठी,
अभिमान मराठी!
मराठी म्हणजे गोडवा,
मराठी म्हणजे प्रेम
मराठी भाषा म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी!
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!