लोकशाही स्पेशल

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 'या' खास संदेशाद्वारे मित्र-मैत्रिणींना द्या शुभेच्छा

भारत तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील. यासाठी भारत सरकारने 1984 मध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

National Youth Day 2024 : भारत तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील. यासाठी भारत सरकारने 1984 मध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला.राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या तरुण मित्र-मैत्रिणींना मेसेजेसच्या माध्यमातून शुभेच्छा द्या.

स्वतंत्र होण्याचे धाडस करा,

जिथपर्यंत तुमचे विचार जातात,

तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा,

विचारांना आयुष्यात उतरवण्याचे धाडस करा,

युवा दिनाच्या शुभेच्छा

उभे रहा, धैर्यवान व्हा, मजबूत व्हा,

सर्व जबाबदारी डोक्यावर घ्या,

लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या नशिबाचे निर्माते आहात

युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्ही जे काही विचार करता, तेच तुम्ही व्हाल,

स्वतःला कमकुवत समजाल तर कमकुवत व्हाल

स्वतःला बलवान समजात तर बलवान व्हाल

युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवसातून एकदा स्वत:शी बोला, नाहीतर तुम्ही या जगात एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला भेटणे चुकवू शकता.

युवा दिनाच्या शुभेच्छा

जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागता तेव्हा आयुष्य सुरु होते...

त्यामुळे आधी स्वतःवर विश्वास ठेवा, त्यानंतर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल...

युवा दिनाच्या शुभेच्छा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद